नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी ढाका दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. जर दहशतवादी स्वत:ला मुस्लीम म्हणत असतील, तर मी मुस्लीम नाही, असे सलीम खान म्हणाले.


https://twitter.com/luvsalimkhan/status/749590646512648192

सलीम खान यांनी रविवारी रात्री ट्वीट करुन बांगलादेशातील ढाका दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

https://twitter.com/luvsalimkhan/status/749590697561427968

सलीम खान म्हणाले, “जगभरातील दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोर स्वत:ला मुस्लीम सांगतात. मुस्लीम व्यक्ती पैगंबर आणि कुराणचं अनुकरण करतो. त्यामुळे मला माहित नाही, हे दहशतवादी कशाचं अनुकरण करतात. पण ते इस्लामचं अनुकरण करत नाहीत, हे निश्चित. जर ते मुस्लीम आहेत, तर मी नाही. पैगंबर सांगतात, एका निर्दोष व्यक्तीला मारणं म्हणजे माणुसकीला मारण्यासारखं आहे.”

https://twitter.com/luvsalimkhan/status/749590757682667520

सलीम खान यांनी म्हणाले की, ईदची प्रार्थना तेव्हाच पूर्ण होणार नाही, जेव्हा दहशतवादी हल्ल्यांसारख्या वाईट कामांचं आपण निषेध करत नाही.

https://twitter.com/luvsalimkhan/status/749590792344313856

याआधी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही म्हटलं होतं की, रमजानमध्ये निर्दोष व्यक्तींना मारणारे मुस्लीम कसे?