Sajid Khan on Sexual Harassment: दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) यांच्यावर काही दिवसांपूर्वी  ' MeToo' मूव्हमेंट पुकारत लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर मात्र, साजिद खान यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. यावेळी साजिद खान यांच्या 'हाऊसफुल 4'चं शुटिंग सुरू होतं. या आरोपांमुळे त्यांची कारकीर्द एका रात्रीत संपली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 54 वर्षांच्या साजिद यांना अपमानाचा सामना करावा लागला. त्यांना बदनाम करण्यात आलं. पण, त्यावेळी साजिद खान काही बोलले नाहीत. अखेर 6 वर्षांनी त्यांनी आपलं मौन सोडलं असून उघडपणे या विषयावर भाष्य केलं आहे. या काळात ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होते, खचले होते, असंही ते म्हणाले. 

Continues below advertisement

दिग्दर्शक साजिद खान यांनी नुकतीच हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना साजिद खान यांनी गेल्या 6 वर्षांच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, "गेल्या सहा वर्षांत मी अनेकदा आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) कडून मंजुरी मिळूनही, मी कामापासून दूर राहिलो. मी माझ्या पायावर परत उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. उत्पन्नाअभावी मला माझं घर विकून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहावं लागलं"

"मी 14 वर्षांचा होतो जेव्हा मी कमावू लागलो, कारण माझ्या वडिलांचं (अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक कामरान खान) निधन झालं. मी आणि (माझी बहीण) फराह (चित्रपट निर्माता आणि नृत्यदिग्दर्शक) कर्जात बुडालो. आज माझी आई जिवंत असती (मनेका इराणी यांचं 2024 मध्ये निधन झालं) तर ती मला माझ्या पायावर परत येण्याचा प्रयत्न करताना पाहू शकली असती. त्याकाळत आयुष्य खूपच कठीण झालं होतं.", असं साजिद खान म्हणाले होते. 

Continues below advertisement

मी स्पष्टवक्ता होतो आणि लोकांना राग दिला : साजिद खान 

"आता प्रत्येकजण YouTube वर करतो, परंतु माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी फक्त हेडलाइन्स बनवण्यासाठी सनसनाटी गोष्टी करायचो. मी जेव्हा टीव्हीवर काम केलं तेव्हा माझं काम लोकांचं मनोरंजन करायचं होतं. मी बऱ्याच लोकांचं मन दुखावलं... आज जेव्हा मी माझ्या काही मुलाखती पाहतो, तेव्हा मला असं वाटतं की, मी टाईम मशीन घेऊन परत जाऊ शकेन आणि त्या माणसाला थांबवेन. म्हणा, "मूर्ख, तू काय म्हणत आहेस? तू इतका स्पष्टवक्ता का आहेस?" शब्दांना काही फरक पडत नाही; काम महत्वाचं आहे. मी खूप स्पष्टवक्ता असल्यामुळे मी लोकांना नाराज केलं. जेव्हा जेव्हा मला हे समजलं, तेव्हा मी माफी मागितली, पण, जेव्हा काम थांबतं, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रश्न विचारू लागता. मी आता शांत झालोय. आता फक्त काम करून जगायचं आहे.", असं साजिद खान म्हणाले.