परदेशातही आता झिंगाट, सैराट लंडनमध्ये प्रदर्शित होणार
एबीपी माझा वेब टीम | 23 Jun 2016 09:28 AM (IST)
मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित, आर्ची-परशा यांची कहाणी दाखवणारा 'सैराट' चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन दोन महिने होत आले, तरी सिनेमाची झिंग काही कमी होत नाहीये. त्यातच 'सैराट' आता लंडनमध्येही प्रदर्शित होणार असल्याचं वृत्त आहे. 'सैराट' हा सिनेमा 9 जुलै रोजी लंडनमध्ये प्रदर्शित होणार आहे. लंडनच्या थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या मोजक्या भारतीय चित्रपटांमध्ये सैराटची वर्णी लागली आहे. त्यामुळे आर्ची आणि परशाची जोडी आता लंडनमधल्या मराठी चाहत्यांसोबतच परदेशी प्रेक्षकांनाही पहायला मिळणार आहे. सैराट चित्रपटाने भारतात विक्रमी कमाई करत 85 कोटींहून जास्त गल्ला कमवला आहे. शंभर कोटींच्या क्लबमध्ये सैराट प्रवेश करेल, अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.