मुंबई : अभिनेता अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘हाऊसफुल 3’ हा सिनेमा यंदाचा विकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.  या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 53 कोटींची कमाई केली आहे. तसंच 'हाऊसफुल 3' ने शाहरुखच्या 'फॅन' सिनेमाचा विक्रमही मोडला आहे.   यापूर्वी यंदा 'फॅन'ने विकेंडमध्ये 52.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र आता 'हाऊसफुल 3'ने त्यापुढे मजल मारली आहे.   'हाऊसफुल 3'ने भारतात 53.31 तर जगभरात 26.77 मिळून 80.08 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.   'फॅन'पाठोपाठ अक्षय कुमारचा एयरलिफ्ट या सिनेमाने 44.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफच्या बागी या सिनेमाने तीन दिवसात 38 कोटींची कमाई केली होती.   'हाऊसफुल 3' ने पहिल्याच दिवशी 15.21 कोटी, दुसऱ्या दिवशी 16.30 कोटी तर तिसऱ्या दिवशी 21.80 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे कमाईचा आकडा 53.31 कोटींवर पोहोचला आहे.   यापूर्वी 2010 मध्ये हाऊसफुल हा सिनेमा आला, तर त्यानंतर 2012 मध्ये 'हाऊसफुल 2' आणि आता 'हाऊसफुल 3' हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे.  

चित्रपट

पहिल्या दिवसाची कमाई

फॅन 19.20 कोटी
हाऊसफुल 3 15.21 कोटी
एअरलिफ्ट 12.35 कोटी
बागी 11.94 कोटी

संबंधित बातमी

'हाऊसफुल 3' चित्रपटाची पहिल्याच दिवशी 'फुल' कमाई