विजापूर: 'सैराट' चित्रपटाने लोकप्रियतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या आहेत. महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा सैराट आता कर्नाटकातही हाऊसफुल्ल आहे. विजापूर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून सैराट जोरात चालला आहे. कर्नाटकच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला मोठी पसंती मिळतेय. मराठीच्या नावाने नाकं मुरडणाऱ्या कानडी लोकांनी सैराटला मोठ्या मनाने स्वीकारलं यातच, सैराटची खासियत आहे.

 

प्रेमला कसलीच सीमा नसते... ना भाषेची, ना धर्माची अन् ना कुठल्या  राज्याची... मग ते खऱ्या आष्युतील असो अथवा चित्रपटातील... अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या सैराट चित्रपटानं लोकप्रियतेची सीमा ओलंडलीय. याचाच प्रत्यय कर्नाटकात पहायला मिळतोय. विजयपूरमधल्या थिएटरबाहेर गेल्या दोन आठवड्यापासून हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत.

 

भाषा समजत नसली तरी कानडी प्रेक्षकांनी सैराटला डोक्यावर घेतलंय. अप्सरा थिएटरबाहेर तिकिटासाठी प्रेक्षकांच्या रांगा पहायला मिळत आहेत. एखाद्या मराठी चित्रपटानं कानडी प्रेक्षक भारावून गेल्याची ही पहिलीच घटना आहे.

 

सध्या बेळगाव आणि विजापूरमध्ये झळकलेल्या या चित्रपटाच्या शोसाठी अवघ्या कर्नाटकातून मागणी येत आहे.

 

उत्तम निर्मिती आणि दर्जेदार कलाकृतीला भाषा आणि राज्याच्या सीमा अडवू शकत नाही हेच या चित्रपटाचं खरं यश आहे.

संबंधित बातम्या


हा 'सैराट' आहे...


सिनेमा पाहिला, नेटवर अर्थ शोधला... अन् मुलाचं नाव ठेवलं 'सैराट'