राज्यभरात 'सैराट'चं याड, पुण्यात हाऊसफुल्ल
एबीपी माझा वेब टीम | 29 Apr 2016 09:18 AM (IST)
मुंबई: दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाला अपेक्षेप्रमाणेच आज मोठा प्रतिसाद मिळतोय. अनेक जण सिनेमाचा पहिलाच शो बघण्यासाठी उत्सुक होते. अनेकांनी सकाळी नऊचा शो बुक केला होता. तर आज दिवसभरातील शोही वेगात बुक होत आहेत. पुण्यात आजचे शो जवळपास हाऊसफुल्ल झाले आहेत. तर शनिवार आणि रविवारचे शोही बुक होत आहेत.