Saif Ali Khan Statement on Knife Attack : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला आहे. मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी घुसलेल्या चोराने जीवघेणा हल्ला केला होता. जखमी सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला 5 दिवसांनी 21 जानेवारीला रुग्णालयात डिस्चार्ज मिळाला. यानंतर आता पोलिसांना सैफ अली खानचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं, हे सैफने सविस्तरपणे पोलिसांना सांगितलं आहे.
सैफ अली खानने जबाबात काय म्हटलंय? (Saif Ali Khan Attack Statement)
- अकराव्या मजल्यावर 3 बेडरूम आहेत, त्यापैकी एका बेडरूममध्ये करीना आणि सैफ राहतात. तैमूर दुसऱ्या खोलीत राहतो आणि त्याची केअरटेकर गीता देखील तिथेच राहते आणि तिसऱ्या खोलीत जहांगीर राहतो आणि त्याची केअरटेकर आलियामा फिलिप देखील त्याच रुममध्ये राहते.
- पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, तो आणि त्याची पत्नी करीना कपूर खान अकराव्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये होते, तेव्हा त्यांना जहांगीरची नॅनी आलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज आला.
- आवाज ऐकून सैफ आणि करिना जेहच्या खोलीत धावले, जिथे त्यांना हल्लेखोर दिसला. घटनेच्या वेळी सैफचा धाकटा मुलगा रडत होता आणि जेव्हा अभिनेत्याने हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोघांमध्ये हाणामारी झाली.
- सैफने हल्लेखोराला धरले होते, पण स्वतःला सोडवण्यासाठी हल्लेखोराने त्याच्या पाठीवर, मानेवर आणि हातावर चाकूने हल्ला केला.
- जखमी असूनही, सैफ अली खानने हल्लेखोराला दूर ढकलले आणि जहांगीरच्या खोलीत बंद केले आणि घरातील कर्मचारी जेहला घेऊन बाराव्या मजल्यावर पळून गेले.
- आवाज ऐकून, जेव्हा इतर कर्मचारी रमेश, हरी, रामू आणि पासवान खाली आले, तेव्हा त्यांनी पाहिले की हल्लेखोर ज्या खोलीत बंद होता, त्या खोलीत तो नव्हता आणि संपूर्ण घरात शोध घेऊनही हल्लेखोर सापडला नाही.
- त्यानंतर, जखमी सैफ अली खानला ऑटो रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :