Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. चाकूहल्ल्यानंतर सैफ अली खानने पहिल्यांदा मुलाखतीत या घटनेवर भाष्य केलं आहे. आपल्यावरील जीवघेण्या चाकूहल्ल्याला आपणच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. सैफ अली खानच्या राहत्या घरी घुसून चोराने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. तात्काळ रुग्णालयात दाखल करत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यानंतर सैफची पहिली मुलाखत

चाकूहल्ल्यानंतर प्रथमच सैफ अली खानने सविस्तर मुलाखत दिली आहे. घराची दारं नीट बंद केली नसल्याने चोरीचा प्रयत्न झाला, त्यामुळे चाकूहल्ल्याला मीच जबाबदार आहे, असं वक्तव्य सैफ अली खाननं केलं. हल्ल्यानंतर आरोपीला फाम करण्याचा विचार मनात होता, पण चाकूहल्ल्यानं जीव गेला असता म्हणून माफीचा विचार सोडला, असल्याचंही सैफ अली खाननं सांगितलं.

"चाकूहल्ल्याला मीच जबाबदार"

सैफने मुलाखतीत सांगितलं की, "माझ्यावरील जीवघेण्या चाकूहल्ल्याला मीच जबाबदार आहे. माझ्या घराची दारं मीच नीट बंद केली नव्हती. मी सोसायटी, मुंबई पोलीस किंवा इतर कुणालाही दोष देत नाही. माझ्याबाबतीत असं काही घडेल याची मी कल्पनाही केली नव्हती. तैमूर म्हणतो, हल्लेखोर भुकेला असावा माफ करावं. मलाही वाटतं हल्लेखोराला माफ करावं वाटत होतं, पण चाकूहल्ल्यानं जीव गेला असता म्हणून माफीचा विचार सोडला". सैफ अली खानने टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

सैफवर जीवघेणा चाकू हल्ला

अभिनेता सैफ अली खानवर जानेवारी महिन्यात जीवघेणा हल्ला झाला होता. एका अज्ञात हल्लेखोराने चोरीच्या प्रयत्नात सैफच्या घरात घुसखोरी केली आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याचा हात, मान आणि पाठीवर चाकूहल्ल्याने वार केलेल्या जखमा झाल्या होत्या. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.

सैफ आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त

सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी 'ज्वेल थीफ' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलिकडेच, तो चित्रपटाच्या एका प्रमोशनल कार्यक्रमातही सहभागी झाला होता, ज्यामध्ये त्याच्या हातावर प्लास्टर आणि मानेवर पट्टी बांधलेली होती. यावेळी त्याने म्हटलं की, "तुमच्या समोर उभं राहून खूप चांगलं वाटक आहे, इथे असणं खूप चांगलं वाटतंय. मी या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Saif-Kareena Divorce : सैफ अली खान आणि करीना कपूरचा घटस्फोट? 'बेबो'ने शेअर केलेल्या पोस्टने एकच खळबळ