मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने अमेझॉन ओरिजिनल सीरिज 'तांडव'च्या बहुप्रतिक्षित ट्रेलरचे लॉन्चिंग केले आहे. हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित व अली अब्बास जफर यांनी याची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. गौरव सोलंकी यांनी लिहिलेल्या या सीरिजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धूलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अन्नूप सोनी, हित्तेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी यांच्यासह अन्य काही उत्तम कलाकार आहेत. अली अब्बास जफर सोबतच, तांडव द्वारे डिंपल कपाडिया आणि कृतिका काम्रा ह्या देखील डिजिटल पदार्पण करणार आहेत आणि सैफ अली खान, झीशान अय्यूब आणि सुनील ग्रोव्हर यांना आपण यापूर्वी कधीही अशा भुमिकेमध्ये पाहिलेले नाही. भारतात आणि 200 हून अधिक देशांमध्ये व प्रांतातील प्राईम मेंबर्स हे 15 जानेवारी 2021 पासून तांडवचे सर्व भाग स्ट्रीम करू शकतात.


जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या राजधानीत ह्याचा सेट उभारला असून, ही मालिका दर्शकांना अराजकतेच्या काळ्या विश्वाच्या गल्ल्यांमध्ये घेऊन जाईल व सत्ता शक्तीच्या मागे लागणाऱ्या लोकांचे काळे रहस्य उलगडेल. ही मालिका एक काल्पनिक पकडून ठेवणारे नाटक आहे. ज्यामध्ये लोक, सत्तेच्या मागे लागून किती खोल आतपर्यंत यामध्ये रुतत जातात हे दर्शवते.


ट्रेलर पाहा



तांडवमधील आपल्या भूमिकेविषयी बोलताना सैफ अली खान म्हणाला की, भारतातील करमणूक उद्योगाने पुन्हा नव निर्मितीच्या काळात पदार्पण केले आहे आणि ‘तांडव’ सारख्या कथा या बदलामध्ये अग्रणी आहेत. यातील ग्रे शेड असलेली भुमिका तर मला नेहमीच रोमांचक वाटते. जेव्हा मी माझ्या समर या पात्राच्या गुंतागुंती बद्दल वाचले आणि तांडवच्या जगामध्ये खोलवर डोकावलो, तेव्हा मला हे कळले की मला ही व्यक्तिरेखा कशी साकारावी लागेल. मी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर या शोच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट बघत आहे.


अभिनेत्री डिंपल कपाडिया म्हणाली की, तांडव हे एक राजकीय थरारक नाटक आहे. आपल्याला पडद्या मागील राजकारण आणि देशातील सत्तेच्या गल्ल्यांमध्ये काय चालले आहे याबद्दल एक स्पष्ट अंतर्दृष्टी देते. अनुराधा ही अशी एक भुमिका आहे जी मी यापूर्वी कधीच केलीली नव्हती