Sai Tamhankar : आज 'राष्ट्रीय पर्यटन दिनी' (National Tourism Day) सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) मोठी घोषणा केली आहे. मराठमोळी अभिनेत्री आता जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. सईची 'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' (Postcards From Maharashtra) ही वेबसीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.


'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' या वेबसीरिजमध्ये महाराष्ट्रातील ऐतिहासिक प्रार्थनास्थळे, किल्ले, जुनी स्मारके यांच्यापासून ते पुणे आणि नाशिकच्या दिव्य मंदिरांपर्यंतच्या ठिकाणांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील तोंडाला पाणी सुटणारे खाद्यपदार्थ आणि शॉपिंग ठिकाणांचा शोध घेताना सई दिसणार आहे. 


सई ताम्हणकर 'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' या वेबसीरिजबद्दल म्हणाली,"माझं स्वत:चं राज्य नव्याने एक्सप्लोर करणं ही खरच खूप कमाल गोष्ट 'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' या वेबसीरिजच्या माध्यमातून मला करता आली. या संधीमुळे मी महाराष्ट्राचं सौदर्य जवळून अनुभवलं. तसेच रुचकर पदार्थ आणि महाराष्ट्राची संस्कृती नव्याने अनुभवता आली. या वेबसीरिजचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. ही वेबसीरिज माझ्यासाठी कायम खास असेल". 






'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना अनेक प्राचीन गोष्टींपासून महाराष्ट्राच्या हिरवळीपर्यंत अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजचा प्रीमियर 29 डिसेंबर 2022 रोजी 'नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर' झाला आहे. तसेच सात भागांच्या या वेबसीरिजचे तीन भाग आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ही वेबसीरिज प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. 


सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सईचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. मराठी मालिका आणि सिनेमांसह सईने वेबसीरिजमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. सई ताम्हणकर सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. सईचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा ती प्रयत्न करत असते.


संबंधित बातम्या


Sai Tamhankar : 'मी शिवाली, मी भिवाली, मी पावली, मी पडली'; सई ताम्हणकरचा ब्यूटी इन ब्लॅक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् धम्माल मिम्सचा पूरच आला