मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 'सचिन- अ बिलियन ड्रिम्स' या सिनेमाचा प्रीमियर शो आज होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता मुंबईतील वर्सोवाजवळील पीव्हीआर चित्रपटगृहात हा शो दाखवण्यात येईल.

यावेळी क्रिकेटसह विविध क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना होण्यापूर्वी, या प्रीमियर शोला हजेरी लावणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सचिनसोबत त्याचा सिनेमा पाहणार आहे.

या सिनेमाद्वारे सचिनच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. क्रिकेटशिवाय  सचिनचं आयुष्य कसं होतं, हे या सिनेमात पाहायला मिळेल.

या सिनेमा पाहण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहेच, शिवाय स्वत: सचिनची उत्सुकताही ताणून धरली आहे.

सामान्य मुंबईकर ते क्रिकेटचा देव हा प्रवास 'सचिन- अ बिलियन ड्रिम्स' या सिनेमात पाहायला मिळेल.

हा सिनेमा 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या 

सचिन तेंडुलकर पंतप्रधान मोदींच्या भेटीला

सचिनच्या बायोपिकचं वायुदलासाठी स्पेशल स्क्रीनिंग