Prashant Damle : मराठी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे प्रशांत दामले (Prashant Damle) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतात. प्रशांत दामले यांनी नुकताच 12,500 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. या निमित्तानं सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी प्रशांत दामले यांना शुभेच्छा देत आहेत. नुकतीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) प्रशांत दामले यांच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करुन सचिननं प्रशांत दामले यांचे कौतुक केलं आहे. 


सचिनची पोस्ट


'मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे. प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा 12500 वा प्रयोग सादर करत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या या विक्रमी कारकीर्दीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.' अशी पोस्ट सचिननं केली आहे. 






विक्रमवीर प्रशांत दामले यांनी आज 12,501 वा प्रयोग सादर केला. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आणि स्मृतिगंधतर्फे 'एका लग्नाची पुढची गोष्ट' (Eka Lagnachi Pudhchi Gosht) या नाटकाचा विनामुल्य प्रयोग ठेवण्यात आला. 


प्रशांत दामलेंनी 1983 साली 'टूरटूर' या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांनी वेगवेगळ्या नाटकांत वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आणि त्यांच्या रंगभूमीवरील प्रवासाची बस सुसाट सुटली. प्रशांत दामले यांच्या नकळत दिसले सारे, कार्टी काळजात घुसली, संगीत संशयकल्लोळ, साखर खाल्लेला माणूस आणि एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.प्रशांत दामले यांनी किचन कल्लाकार या कार्यक्रमाध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडली. तसेच आम्ही सारे खवैये या कार्यक्रमाचं त्यांनी सूत्रसंचालन केलं. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Prashant Damle : 'टायपिंग मास्टर' ते 'रंगभूमीचा बादशाह'; ‘बुकिंगचा सम्राट’ प्रशांत दामले लवकरच पार करणार 12,500 प्रयोगांचा टप्पा