मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपण क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम रचताना पाहिलं आहे. मात्र आता त्याचा गाता गळा ऐकण्याची संधी चाहत्यांना मिळत आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगमच्या सोबतीने सचिनने संगीत क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे.


100 एमबी (मास्टर ब्लास्टर) ने 'सचिन्स क्रिकेट वाली बीट' हा अल्बम लाँच केला आहे. 'गेंद आयी, बल्ला घुमा, मारा छक्का, सचिन सचिन... नाचो नाचो सब क्रिकेट वाली बीट पे' असे या गाण्याचे शब्द आहेत. सोनू निगम सचिनच्या या नव्या इनिंगचा भाग आहे. मूळ संकल्पना आणि संगीत दिग्दर्शन शमीर टंडन यांचं आहे.

'सचिन हा उत्तम गायक आहे. तो योग्य सुरात गायल्यामुळे पिच करेक्टर वापरण्याची गरजच पडली नाही. अत्यंत लाजाळू स्वभाव असूनही मी शूटिंगच्या वेळी मस्ती सुरु करताच त्याने सहजतेने जुळवून घेतलं' असं सोनू निगम म्हणाला.

पाहा व्हिडिओ :