S. S. Rajamouli: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांचा आज वाढदिवस. 10 ऑक्टोबर 1973 रोजी  कर्नाटकमधील रायचूर येथे एसएस राजामौली यांचा जन्म झाला.  एसएस राजामौली यांचे वडील व्ही. विजयेंद्र प्रसाद (V. Vijayendra Prasad) हे प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर आहेत. कोदुरी श्रीशैला श्री राजामौली असं  एसएस राजामौली  यांचं संपूर्ण नाव आहे. त्यांच्या आईचं नाव राजा नंदिनी आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर एसएस राजामौली आंध्र प्रदेश राज्यात गेले. तिथे त्यांनी रेड्डी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलं.  


 ईनाडुवरील तेलुगु शोचं दिग्दर्शन करुन राजामौली यांनी करिअरला सुरुवात केली. राजामौली यांना बाहुबली (बाहुबली: द बिगिनिंग) आणि बाहुबली: द कन्क्लूजन या चित्रपटांमधून विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांचा आरआरआर हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला. या चित्रपटानं 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. 


एसएस राजामौली कोट्यवधींचे मालक 


एसएस राजामौली यांचे घर 
एसएस राजामौली हे हैदराबादमध्ये राहतात. एसएस राजामौली यांचे हैदराबादमधील बंजारा हिल्स येथे घर आहे. हे घर त्यांनी 2008 मध्ये घेतले होते. रिपोर्टनुसार, एसएस राजामौली हे एक वर्षात 13 कोटी रुपये कमाई करतात. 2022 मध्ये एसएस राजामौली यांनी जवळपास 24 कोटी रुपये कमाई केली. 
कार कलेक्शन 
रेंज रोवर आणि बीएमडब्ल्यू यांसारख्या गाड्या एसएस राजामौली यांच्याकडे आहेत. या गाड्यांची किंमत जवळपास 1.5 कोटी रुपये आहे.


रमा आणि एसएस राजामौली यांची लव्हस्टोरी


राजामौली यांनी 2001 मध्ये चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली त्याच वर्षी त्यांचे लग्न झाले. राजामौली आणि त्यांची पत्नी रमा यांची लव्हस्टोरी हटके आहे.  राजामौली जेव्हा प्रेमात पडले, तेव्हा त्यांच्या पत्नी या पहिल्या विवाहातून वेगळ्या झाल्या होत्या. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान राजामौली यांनी त्यांना भावनिक आधार दिला आणि मदतही केली.






वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Yash : 'यशचे वडील आजही बस चालवतात'; दिग्दर्शक एसएस राजामौलींची माहिती