मुंबई : बॉलिवूडचे दोन सुपरस्टार अक्षयकुमार आणि हृतिक रोशन यांची टक्कर बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी पाहायला मिळाली. तुल्यबळ अभिनेत्यांच्या दोन सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मात्र जमीन-आस्मानाचा फरक पाहायला मिळत आहे. रुस्तमने पहिल्या वीकेंडला 50.54 कोटी, तर मोहेंजोदारोने 31.3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
  ‘रुस्तम’ सिनेमाने ओपनिंगच्या दिवशीच एकूण 14.11 कोटी रुपये कमवले. तर हृतिक रोशनच्या ‘मोहंजोदारो’ सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 8.87 कोटींची कमाई केली. प्रेक्षकांनी रुस्तमला पसंती दिल्यानंतर माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर आणखी प्रेक्षकवर्ग खेचून आणला, तर हृतिकच्या मोहंजोदारोला प्रेक्षकांनी नाखुशी दर्शवली. 15 ऑगस्ट हा एक्स्टेंडेड वीकेंड असल्यामुळे, त्यातच रुस्तम हा देशभक्तिपर चित्रपट असल्यामुळे रुस्तमच्या कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.    

पहिल्या वीकेंडची कमाई :

 
 

 रुस्तम ( कोटींमध्ये)

 मोहंजोदारो ( कोटींमध्ये)

शुक्रवार (12 ऑगस्ट) 14.11 8.87
शनिवार (13 ऑगस्ट) 16.43 9.93
रविवार (14 ऑगस्ट) 20 12.5
एकूण

50.54

31.3

  ‘रुस्तम’ सिनेमा देशभरात 2 हजार 300 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला असून, एअरलिफ्ट आणि हाऊसफुल 3 च्या तुलनेत हा आकडा कमी आहेत. मात्र, स्क्रीन्सच्या हिशोबाने पाहिल्यास ‘रुस्तम’ची पहिल्या दिवसाची कमाई अधिक आहे. कारण जास्त स्क्रीनवर रिलीज होऊनही एअरलिफ्ट सिनेमाने पहिल्या दिवसी केवळ 12.35 कोटी आणि हाऊसफुल 3 सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 15.02 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.   आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहंजोदारो’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 8 कोटी 87 लाखांची कमाई केली. या सिनेमातून पूजा हेगडेने पदार्पण केलं असून, हृतिक रोशनसारखा लोकप्रियतेचं मोठं वलय असलेला अभिनेताही यात आहे. मात्र, तरीही सिनेमाने पहिल्याच दिवशी म्हणावी तशी कमाई केल्याचं दिसत नाही.