मुंबई : चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या त्यांच्या 'RRR' चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. 25 मार्च रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडून जगभरात 1100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली आणखी एका कारणामुळे सध्या चर्चेत आले आहेत.


राजामौली यांनी एक आलिशान कार खरेदी केली आहे. एस एस राजामौली यांनी Red Volvo XC40 नावाची कार खरेदी केली आहे. त्याचा फोटोही समोर आला असून त्यात ते गाडीची चावी घेताना दिसत आहेत. या कारची किंमत 44.50 लाख रुपये आहे. ही कार सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यापैकी राजामौली यांनी लाल रंग निवडला आहे. व्होल्वो कार इंडियाने राजामौली यांचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला करुन व्होल्वो कार इंडिया कुटुंबात त्यांचे स्वागत केले. व्होल्वो कार इंडियाने लिहिलं आहे की, "आम्ही आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एस एस राजामौली यांचं व्होल्वो कार इंडिया कुटुंबात स्वागत करतो."






राजामौली यांच्याकडील कार 
उत्कृष्ट दिग्दर्शक असलेल्या एसएस राजामौली यांच्याकडे अनेक आलिशान कार आहेत, ज्यात BMW 7 सीरीज आणि लँड रोव्हर रेंज रोव्हर यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्या कमाईबद्दल बोलायचे झालं तर त्यांनी RRR चित्रपटासाठी 28 कोटी रुपये फी आकारली आहे.


राजामौली हे चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शक समजले जातात. त्यांनी बनवलेले जवळपास सर्वच चित्रपट हिट ठरले आहेत. बाहुबली : द बीगिनिंग या चित्रपटामुळे राजामौली पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले.  चित्रपटही रेकॉर्डब्रेक कमाई करण्यात यशस्वी ठरला होता. यानंतर बाहुबली: द कन्क्लुजन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागानेही यशाची शिखरं गाठत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.