S. S. Rajamouli  :  चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli) आणि त्यांचा मुलगा एसएस कार्तिकेय हे भूकंपात बचावले आहेत. गुरुवारी, 21 मार्च रोजी आलेल्या जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. हा  भूकंप 5.3 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता. राजामौली यांचा मुलगा कार्तिकेय याने सांगितले की,  भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा आरआरआर चित्रपटाची सगळी टीम 28 व्या मजल्यावर होती. 


एसएस कार्तिकेय याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनुभव सांगताना म्हटले की, जपानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला.  त्यावेळी आम्ही 28 व्या मजल्यावर होतो, जमीन हादरू लागली. हा भूकंपाचा धक्का आहे हे जाणवण्यासाठी काही वेळ जावा लागला. त्यावेळी मी भितीने ओरडणार होतो. आमच्या आजूबाजूला जपानी नागरीक होते. त्यांना याचा काहीच फरक पडला नाही. 






जपानमध्ये जाणवले भूकंपाचे 21 धक्के


जपानच्या हवामान खात्याने गुरुवारी सांगितले की, जपानच्या पूर्व भागातील इबाराकीमध्ये 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. नव्या वर्षात एक जानेवारी रोजी जपानमध्ये 21 धक्के जाणवले. यामध्ये एका भूकंपाची तीव्रता 7.6  रिश्टर स्केल इतकी होती. 


आरआरआरच्या स्क्रिनिंगसाठी राजामौली जपानमध्ये






एसएस राजामौली हे चित्रपटाच्या टीमसह गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये आहेत. चित्रपटाची टीम आणि कुटुंबासह आरआरआरच्या स्क्रीनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी राजामौली जपानमध्ये आहेत. राजामौली यांचा हा चित्रपट जपानमध्ये गेल्या 513 दिवसांपासून झळकत आहे. जपानमध्ये या चित्रपटाची क्रेझ दिसून आली. स्क्रिनिंग दरम्यान एका चाहत्याने राजामौली यांना शुभेच्छा म्हणून एक हजार ओरिगामी क्रेन भेट दिल्या होत्या.


राजामौलींनी एका पेक्षा एक सुपरहिट सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. यात 'बाहुबली' (Baahubali) ते 'आरआरआर' (RRR) या सिनेमांचा समावेश आहे. एस. एस. राजामौलींनी ज्यु. एनटीआर (Jr. NTR) मुख्य भुमिकेत असलेल्या 'स्टुडंट नं. 1' या तेलुगू सिनेमाच्या माध्यमातून 2001 मध्ये दिग्दर्शनामध्ये पदार्पण केले. भारतात हा सिनेमा चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला.