Rocky Aur Rani Ki Prem Kahani: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. फिल्ममेकर करण जोहरच्या या चित्रपटाची रिलीज डेट आज जाहीर करण्यात आली आहे. करण जोहर, आलिया भट्ट आणि रणबीर सिंह यांनी सोशल मीडियावर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील रणवीर आणि आलिया यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


कधी रिलीज होणार चित्रपट? 


आज करण जोहरचा बर्थ-डे आहे. त्यामुळे करणनं त्याच्या वाढदिवसाला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.


रॉकीच्या लूकनं वेधलं लक्ष


सोशल मीडियावर करणनं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामधील कलाकारांचा लूक शेअर केला आहे.  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील रॉकीच्या म्हणजेच रणवीरच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या पोस्टरमधील रणवीर हा फंकी लूकमध्ये दिसत आहे.






राणीच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती 


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात राणी ही भूमिका अभिनेत्री आलिया भट्टनं साकारली आहे. या चित्रपटामधील आलियाच्या लूकचा फोटो देखील करणनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया ही  साडी, टिकली आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. आलियाच्या या लूकला नेटकऱ्यांनी पसंती मिळत आहे. 






तसेच करणनं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे काही पोस्टर्स शेअर केले आहेत. या पोस्टर्समधील आलिया आणि रणवीरच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 






 रंधवा आणि चॅटर्जी कुटुंबाची गोष्ट


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात  रंधवा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. करणनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये रंधवा या कुटुंबात  रणवीरसोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग हे दिसत आहेत. तर चॅटर्जी कुटुंबात आलिया आणि शबाना आझमी यांच्यासोबत इतर काही सदस्य दिसत आहेत. 






'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. पण त्यानंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


संबंधित बातम्या


Kshitee Jog : रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' मध्ये झळकणार मराठमोळी क्षिती जोग