श्रद्धा, फरहानच्या 'रॉक ऑन 2'चा ट्रेलर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 25 Oct 2016 11:02 AM (IST)
नवी दिल्लीः अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्या 'रॉक ऑन 2' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'रॉक ऑन' या 2008 मधील सिनेमाचा हा सिक्वेल आहे. गायक बनण्यासाठीचा श्रद्धाचा प्रवास या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. दमदार संगीतामुळे ट्रेलरनंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. श्रद्धा वगळता या सिनेमात जवळपास सर्व स्टार कास्ट 'रॉक ऑन'मधीलच आहे. https://twitter.com/FarOutAkhtar/status/790582909564444673 सिनेमा येत्या 11 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. फरहान अख्तरसह अर्जुन रामपाल, प्राची देसाई या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. पाहा ट्रेलरः