मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राजकीय नेत्यांपासून बॉलिवूडच्या कलाकरांनी दोन्ही महान नेत्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली.
'जय जवान जय किसान' अशी घोषणा देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांना अभिनेता रितेश देशमुखने अनोखी आदरांजली वाहिली. रितेश देशमुखने शेतावर जाऊन स्वत: काम केलं. रितेशने शेतावर ऊस कापले. ऊस कापतानाचा हा व्हिडीओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
https://twitter.com/Riteishd/status/914778983710867457
"शेताच्या बांधावर शेतकऱ्याचा मुलगा. जय किसान, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त आदरांजली. #जयजवानजयकिसान," असं ट्वीट रितेशने केलं आहे.
याशिवाय रितेश महत्मा गांधी यांनाही श्रद्धांजली वाहिली. रितेशने लिहिलं आहे की, "राष्ट्रपित्याला विनम्र अभिवादन. त्यांची मूल्ये आजही लागू होतात कारण ती आपल्या स्वातंत्र्य संघर्षाच्या काळातील होते."
https://twitter.com/Riteishd/status/914700080728350721
शेतात काम करुन रितेश देशमुखची लाल बहादूर शास्त्रींना अनोखी श्रद्धांजली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Oct 2017 04:10 PM (IST)
रितेश देशमुखने शेतावर जाऊन स्वत: काम केलं. रितेशने शेतावर ऊस कापले. ऊस कापतानाचा हा व्हिडीओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -