Sakshi Dhoni: क्रिकेटर एमएस धोनी (MS Dhoni) आणि त्याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) यांच्या धोनी एंटरटेन्मेंट या बॅनरचा 'लेट्स गेट मॅरिड (Let's Get Married) उर्फ ​​एलजीएम (LGM) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात साक्षी धोनीने तिच्या आवडत्या साऊथ सुपरस्टारबाबत सांगितलं आहे.


एमएस धोनी आणि साक्षी 'लेट्स गेट मॅरीड उर्फ ​​एलजीएम' या रोमँटिक चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हैदराबादमध्ये एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये साक्षीला तिच्या आवडत्या साऊथ सुपरस्टारबद्दल विचारण्यात आलं. यावेळी साक्षीनं सांगितलं की, ती अल्लू अर्जुनची (Allu Arjun) खूप मोठी फॅन आहे. अल्लू अर्जुनच्या  एका फॅन पेजने साक्षीचा याचा व्हिडिओ शेअर केला आहे.


अल्लू अर्जुनच्या एका फॅन पेजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  साक्षीला  एक व्यक्ती प्रश्न विचारतो की, तुम्ही कोणता तेलुगु चित्रपट पाहिला आहे का? या प्रश्नाला साक्षीने उत्तर दिले, "मी अल्लू अर्जुनचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. परंतु, तेव्हा नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार नव्हते. ते सर्व चित्रपट यूट्यूबवर बघायला मिळत होते. ते सर्व तेलुगु चित्रपट हिंदीत बघायला मिळत होते. त्यामुळे मी अल्लू अर्जुनचे सर्व चित्रपट पाहिले आणि मी त्याची खूप मोठी फॅन आहे." साक्षीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.






अल्लू अर्जुनचे चित्रपट


अल्लूचा 'पुष्पा 2' (Pushpa-2) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची अनेक जण आतुरतेने वाट पाहत आहे.पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन (Allu Arjun), रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.  आता पुष्पा या चित्रपटाच्या सिक्वेलला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :