मुंबई : बॉलिवूडमधला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख एका कपड्यांच्या दुकानात चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. रितेशचा आगामी चित्रपट 'हाऊसफुल्ल 3' प्रदर्शनाच्या वाटेवर असताना आलेल्या या आश्चर्यकारक बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.   रितेश देशमुखचा हाऊलफुल्ल 3 चित्रपट तीन जून रोजी प्रदर्शित होणार असून त्यात अक्षयकुमार, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, लिसा हेडन, नर्गिस फाक्री ही गँग सोबत दिसणार आहे. मात्र शॉपलिफ्टिंग करणाऱ्या रितेश सीसीटीव्ही फूटेज जारी करुन खळबळ उडवण्यात आली आहे.   सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या दृश्यांनुसार रितेश वेगवेगळे कपडे शोधत आहे. त्यापैकी आवडलेले कपडे त्याने हळूच लपवले आणि घाईघाईत स्टोअरमधून काढता पाय घेतला. हा पब्लिसिटी स्टंट आहे, का काय याबाबत अद्याप खुलासा झालेला नसला तरी #ChorInTheStore या हॅशटॅगसह तो सोशल मीडियावर ट्रेण्ड होताना दिसत आहे. रितेशचे चाहतेही बुचकळ्यात पडले असून आपला लाडका स्टार असं कृत्य करुच शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.   विशेष म्हणजे रितेशचे मित्र, अभिनेता दिनो मोरिया आणि अभिनेत्री मंदिरा बेदी यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. दिनोने रितेशचं कौतुक केलं आहे, तर मंदिराने मात्र आश्चर्य व्यक्त केलं आहे.     पाहा व्हिडिओ :   https://twitter.com/DinoMorea9/status/735039077511139328