मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या घरी आणखी एक नवा पाहुणा आला आहे. जेनेलियाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. जेनेलियाने आज सकाळीच ही गोड बातमी दिली.   यानंतर रितेशने त्यांच्या छोट्या रिआनला भाऊ झाल्याचं ट्विट केलं.   जेनेलिया दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. मात्र जेनेलिया सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहात असल्यामुळे, त्याला दुजोरा मिळत नव्हता. अखेर आज रितेश - जेनेलियाने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्या.   यापूर्वी रितेश-जेनेलियाने 25 नोव्हेंबर 2014 रोजी रिआनला जन्म दिला होता.   रितेश आणि जेनेलिया यांचा विवाह 3 फेब्रुवारी 2012 रोजी झाला. 2003 मध्ये आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाच्या सेटवर त्यांच्या अफेअरची सुरुवात झाली होती. के. विजया राव यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमातून दोघांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.   सध्या रितेशचा हाऊसफुल्ल 3 आणि बँजो हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. बँजोचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. तर हाऊसफुल्ल 3 हा सिनेमा 3 जूनला प्रदर्शित होत आहे.

संबंधित बातम्या

रितेश- जेनेलियाच्या बाळाचं बारसं, रितेशने बाळाचं नाव ठेवलं...

विलासरावांना नातवाचंही अभिवादन, जयंतीनिमित्त रितेशसह चिमुकला रिआनही नतमस्तक

जेनेलियासमोर पुन्हा लग्नाचा प्रस्ताव

रितेश- जेनेलियाचा 'लय भारी' पाहुणा घरी आला !