प्रिया... माझ्या वेळी कुठे होतीस? : ऋषी कपूर
एबीपी माझा वेब टीम | 16 Feb 2018 10:58 PM (IST)
‘माझ्या वेळेला आली नाहीस, कुठे होतीस,’ असं मिश्कील ट्वीट ऋषी कपूर यांनी केलं आहे.
मुंबई : आपल्या डोळ्यांच्या हावभावामुळे नॅशनल क्रश बनलेल्या प्रिया प्रकाश वॉरियरचे आता ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूरही फॅन झाले आहेत. ‘माझ्या वेळेला आली नाहीस, कुठे होतीस,’ असं मिश्कील ट्वीट ऋषी कपूर यांनी केलं आहे. ''या मुलीला प्रचंड स्टारडम मिळेल. प्रिया ही व्यक्त होणारी आणि निरागस मुलगी आहे. तुझ्या वयोगटातल्या मुलींसाठी भावी कारकीर्दीची शर्यत तू भलतीच कठीण करुन ठेवणार आहेस.. खुप मोठी होशील.. तुला खुप खुप शुभेच्छा.. माझ्या वेळेला आली नाहीस.. का?'' अशा मिश्कील शैलीत ऋषी कपूर यांनी ट्वीट केलं आहे. Exclusive : रातोरात लोकप्रिय झाल्याने घराबाहेर जाणंही बंद झालं : प्रिया प्रकाश प्रिया वॉरियर कोण आहे? प्रिया अवघी 18 वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत आहे. ओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून प्रिया पदार्पण करत आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं. व्हायरल झालेली क्लीप ही त्याच गाण्याचा एक भाग आहे. हे गाणं शान रहमानने संगीतबद्ध केलं असून विनीथ श्रीनिवासनने गायलं आहे.