कपूर खानदानाची दादागिरी, पत्रकारांना मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 15 Sep 2016 07:44 PM (IST)
मुंबई : मुंबईसह देशभरात आज गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे. मात्र आरके स्टुडिओच्या गणपती विसर्जनावेळी अभिनेता ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांनी पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याला ऋषी कपूर यांनी मारहाण केली. शिवाय प्रतिक्रिया घेण्यासाठी ऋषी कपूर यांच्या गाडीजवळ गेलेल्या एका पत्रकाराला त्यांनी धक्काबुक्की केल्याचं कळतं. गणपतीची आरती झाल्यानंतर पत्रकाराने रणधीर कपूर यांना प्रतिक्रिया विचारली. मात्र यावर रणधीर कपूर यांनी कोणतंही भाष्य न करता थेट पत्रकाराला मारहाण केली. पाहा व्हिडीओ