Richa Chadha: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो एअरलाइन (Indigo Airline) चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटला उशीर झाला. त्यामुळे संतापलेले प्रवासी एअरक्राफ्ट पार्किंगमध्ये बसले आणि तिथेच जमिनीवर बसून जेवण केलं. याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता अभिनेत्री रिचा चढ्ढानं (Richa Chadha) देशभरातील विमानांना झालेल्या विलंबाबद्दल एक ट्वीट शेअर केलं आहे.


रिचानं शेअर केलं ट्वीट


रिचानं ट्वीटमध्ये लिहिलं, " हे तीन दिवसांतील माझ्या तिसर्‍या फ्लाइट्सबद्दल आहे. पहिल्या दिवशी इंडिगोला चार तासांपेक्षा जास्त उशीर झाला, दुसऱ्या दिवशी इंडिगोला पुन्हा चार तास उशीर झाला, काही मार्गांवर थेट फ्लाइट्स अनेकदा इंडिगोच्याच असतात. दिवस 3, आंतरराष्ट्रीय फ्लाइट- यात काही अडचण आली नाही"


"14 जानेवारीला मुंबईत एअर शो होता, त्यामुळे सकाळी रनवे बंद करण्यात आला होता आणि नंतर उत्तर भारतात धुके/स्मॉग असल्यामुळे दिल्लीतील रनवे बंद करण्यात आला होता. देशभरातील विमानांना उशीर झाला. कर्मचाऱ्यांना जास्त काम करावे लागेल.", असंही रिचानं ट्वीटमध्ये लिहिलं.






फ्लाइटमधील एका घटनेचा देखील रिचानं ट्वीटमध्ये उल्लेख केला. तिनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मला आश्चर्य वाटते की, एका व्यक्तीवर हल्ला झाला. लोकांमध्ये संताप वाढल्याने हा प्रकार घडला आहे. मात्र, मी अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या विरोधात आहे.'


रिचानं ट्वीटमध्ये लिहिलं की, "या सर्व घटनेनं एक महत्त्वाचा धडा शिकवला आहे. विमान कंपन्यांच्या विलंबामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. जोपर्यंत आपण हे ओळखत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागेल, आपण असेच पैसे देऊन तोट्यात राहू. आता आपण जागे झालो नाही तर आपण या सर्व गोष्टींना पात्र आहोत." रिचाच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 


काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राधिका आपटेनं देखील तिला विमानतळावर आलेल्या अनुभवाबद्दल नेटकऱ्यांना सांगून संताप व्यक्त केला होता.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Radhika Apte: 'पाणी नाही, टॉयलेट नाही...'; राधिका आपटेची संतप्त पोस्ट, नेमकं प्रकरण काय?