Maharashtra : आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान त्यांनी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना केली आहे. 


राहुल कनाल काय म्हणाले?


राहुल कनाल  म्हणाले,"मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. सुशांत आणि दिशाप्रकरणात जर माझं नाव असेल तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे". सुशांत आणि दिशा प्रकरणामुळे शिंदे गटात आल्याच्या आरोपांना कनाल यांनी उत्तर दिलं आहे.






ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत डेरेदाखल झालेल्या राहुल कनाल यांनी आता थेट आदित्य ठाकरेंवर पहिला घाव केला आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करुन सखोल चौकशी करण्याची मागणी राहुल कनाल यांनी केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनाल यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. त्यावेळा राहुल यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणावर भाष्य केलं. 
दिशा सालियान प्रकरणाची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची टीका होत होती. त्याला उत्तर देताना कनाल यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.


योग्य वेळ आल्यावर मी या प्रकरणावर भाष्य करेन : देवेंद्र फडणवीस


सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra  Fadnavis) म्हणाले होते,"या प्रकरणाचा तपास सुरू असून पुराव्यांची विश्वासार्हता तपासली जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे योग्य वेळ आल्यावर मी त्याप्रकरणावर बोलेन".


संबंधित बातम्या


Rahul Kanal: पक्षासाठी काहीच करत नाहीत त्यांना मानाचं स्थान दिलं जातंय; राहुल कनाल यांची ठाकरे परिवारावर टीका