रेणुका शहाणेने फेसबुकवर तिची प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. सलमानची निर्दोष सुटका होण्यासोबतच या प्रकरणाचा निकाल उशिरा लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे. याचसोबत तसंच इतर कलाकारांना या निर्णयातून का वगळलं असंही रेणुका म्हणाली. संबंधित घटनेवेळी जोधपूरमध्ये सलमानसह, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्र आणि नीलम 'हम साथ साथ है' सिनेमाची शूटिंग करत होते.
त्यांनी लोप होत असलेल्या प्राण्यांची शिकार करुन खाल्लंही. परंतु त्यापैकी केवळ सलमानवरच काळवीटच्या शिकारीचा आरोप लागला. सलमान जोधपूर जेलमध्येही गेला. पण इतरांविरोधात कोणताही आरोप लावण्यात आला नाही, असं रेणुकाने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
काळवीटची शिकार कोणी केली? ड्रायव्हरने काळवीटला मारलं? कोणीच काळवीटला मारलं नाही?, असे अनेक प्रश्न रेणुका शहाणेने राजस्थान हायकोर्टाच्या निकालानंतर उपस्थित केले.