मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या मच अवेटेड 2.0 या बिग बजेट सिनेमाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 27 एप्रिल 2018 रोजी हा सिनेमा रिलीज होईल, अशी माहिती समीक्षक तरण आदर्शने दिली आहे.


2.0 या सिनेमाचं दिग्दर्शन एस शंकर करत आहेत. 350 कोटी रुपये एवढं या सिनेमाचं बजेट असल्याचं बोललं जातं. अक्षय कुमार, रजनीकांत, एमी जॅक्सन, सुधांशु पांडे आणि आदिल हुसैन यांसारखे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.

अक्षयने या सिनेमात एका विक्षिप्त वैज्ञानिकाची भूमिका साकारली असून, सुपरस्टार रजनिकांत वसीगरन या वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 350 कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा 2010 मधील 'एंथिरन' या तामिळ सिनेमाचा सीक्वेल आहे.

संबंधित बातम्या :

अक्षय कुमार आणि रजनीकांतचा सिनेमा '2.0'चं पोस्टर लाँच


'2.0' सिनेमातील अक्षयचा लूक बॉलिवूडमध्ये लोक


रजनीकांत आणि अक्षय कुमारचा 2.0 भारतातील सर्वात महागडा सिनेमा


रिलीजपूर्वीच रजनीच्या 'रोबो 2.0'ची 110 कोटींची कमाई


रिलीजआधीच रजनीकांतच्या '2.0' ने 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडला!


मेकिंग ऑफ 2.0! आशियातील सर्वात बिग बजेट सिनेमाचा व्हिडिओ रिलीज


म्हणून '2.0' मधील रजनीच्या भूमिकेची ऑफर आमीरने नाकारली


अक्षयचे पॅडमॅन आणि 2.0 प्रजासत्ताक दिनालाच रीलिज होणार?