Top Gun Maverick : टॉम क्रूझचा (Tom Cruise) 'टॉप गन मॅव्हरिक' (Top Gun Maverick) हा सिनेमा रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यातदेखील सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. या सिनेमाने जगभरात आतापर्यंत 4 हजार 284 कोटींची कमाई केली आहे. 


'टॉप गन मॅव्हरिक'ने पहिल्याच विकेंडला केली होती 750 कोटींची कमाई


'टॉप गन मॅव्हरिक' या सिनेमाने पहिल्याच विकेंडला 750 कोटींची कमाई केली होती. भारतात हा सिनेमा चांगली कमाई करत नसला तरी जगभरात या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. हा सिनेमा आधी 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. 


'टॉप गन मॅव्हरिक' हॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक


'टॉप गन मॅव्हरिक' हा सिनेमा 64 देशांत प्रदर्शित झाला आहे. 'टॉप गन मॅव्हरिक' या सिनेमाला जगभरातील सिनेरसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमाचे कथानक प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. 'टॉप गन मॅव्हरिक' हा सिनेमा हॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. जोसेफ कोसिंस्की यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिनेमॅट्रोग्राफी आणि स्पेशल इफेक्ट्स अशा सगळ्या गोष्टींमुळे सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 






'टॉप गन मॅव्हरिक'मध्ये टॉम क्रूझ प्रमुख भूमिकेत


'टॉप गन मॅव्हरिक' सिनेमात टॉम क्रूझ प्रमुख  भूमिकेत आहे. तर जेनिफर कॉनेली, जॉन हॅम, ग्लेन पॉवेल, लुईस पुलमन, डॅनी रामिरेझ, मोनिका बार्बरो, एड हॅरिस आणि व्हॅल किल्मर हे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


संबंधित बातम्या


Top Gun Maverick : टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, अमेरिकेत विकेंडला केली 1129 कोटींची कमाई


Top Gun Maverick : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाचा होणार प्रीमिअर