मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने बॉक्स ऑफिसवर 'दंगल' केली आहे. वीकेंडला 100 कोटींचा गल्ला पार करणाऱ्या 'दंगल' सिनेमाने अवघ्या पाच दिवसांत तब्बल 155 कोटींपर्यंत मजल मारली आहे. पाच दिवसात 155 कोटींची कमाई करुन बॉलिवूडमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली आहे.


'दंगल'ची भारतातील आतापर्यंतची कमाई :

  • शुक्रवारी (पहिला दिवस) - 29.78 कोटी

  • शनिवार (दुसरा दिवस) - 34.82 कोटी

  • रविवार (तिसरा दिवस) - 42.35 कोटी

  • सोमवार (चौथा दिवस) - 25.48 कोटी

  • मंगळवार (पाचवा दिवस) - 23.07 कोटी

  • पाच दिवसात एकूण - 155.53 कोटी रुपये


सिनेमाचं कथानक हरियाणातील पैलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत आहे. आमीर खाननं महावीर सिंह फोगट यांची भूमिका जीवंत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या सिनेमात महावीर सिंह फोगट यांनी आपल्या मुली गीता आणि बबीता यांना कशाप्रकारे कुस्तीचं प्रशिक्षण देत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बनवलं.

https://twitter.com/taran_adarsh/status/813986422734454785

आमीर खानचे 100 कोटी क्लबमधील सिनेमे :

  • गजनी – 2008

  • 3 इडियट्स – 2009

  • धूम 3 – 2013

  • पीके – 2014

  • दंगल – 2016