Ratan Tata: ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हे भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर रतन टाटा यांचे आयुष्य मांडण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा (Sudha Kongara) या रतन टाटा यांच्या बायोपिकचे (Ratan Tata biopic) दिग्दर्शन करणार आहेत.  या चित्रपटासाठी संपूर्ण रिसर्च करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शिका सुधा या उत्सुक आहेत. 


2023 मध्ये शूटिंगला सुरुवात


रिपोर्टनुसार, या चित्रपटात रतन टाटा यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी दाखवण्यात येणार आहेत, ज्या अनेकांना माहित नसतील. सध्या फिल्म मेकर्स या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत.  या चित्रपटाच्या शूटिंगला 2023 मध्ये सुरुवात होणार आहे.


प्रमुख भूमिकेसाठी या अभिनेत्यांच्या नावाची चर्चा 
रिपोर्टनुसार, रतन टाटा यांच्या बायोपिकमध्ये रतन टाटा यांच्या भूमिकेसाठी अभिनेता अभिषेक बच्चन किंवा अभिनेता सूर्या यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. रतन टाटा यांची भूमिका या चित्रपटात कोणता अभिनेता साकारेल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल, असं म्हटलं जात आहे. 


रतन टाटा हे टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत. 1991 पासून टाटा समूहामध्ये काम केल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये सेवानिवृत्ती घेतली. नुकतेच रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) संलग्न संस्थेकडून 'सेवारत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


सुधा कोंगारा यांनी आंध्र अंदगाडू चित्रपटामधून तेलुगू चित्रपटसृष्टीत  पदार्पण केले. त्यांनी सूरराई पोट्रू या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. आता त्या सूरराई पोट्रूच्या हिंदी रिमेकची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिका साकारणार आहे.




वाचा इतर महत्वाच्या बातम्या


Ratan Tata : ना बॉडीगार्ड, ना लवाजमा; नॅनोमध्ये बसून रतन टाटा पोहोचले ताज हॉटेलमध्ये; नेटकऱ्यांकडून कौतुक