Rasika Sunil: मराठी मलिका आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका सुनीलचा (Rasika Sunil) काल वाढदिवस होता. रसिकाच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नुकतीच रसिकानं एक खास व्हिडीओ शेअर केला. रसिकानं तिच्या वाढदिवसाला एक आलिशान गाडी घेतली आहे. रसिकानं या गाडीचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी नवीन गाडी घेतल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं.
मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला व्हिडीओ रसिकानं रिपोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रसिका ही तिच्या कुटुंबासोबत गाडीच्या शोरुममध्ये आलेली दिसत आहे. रसिकानं गाडीच्या शोरुममध्ये केक कट केला. त्यानंतर गाडीची चावी रसिकाला देण्यात आली.
मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या रसिकाच्या नव्या कारच्या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, 'रसिकानं तिचा वाढदिवस स्टाईलमध्ये साजरा केला आहे. लँडमार्क कार्स तिला आयुष्यभर आनंदी राहण्यासाठी आणि यशासाठी हार्दिक शुभेच्छा देते.' रसिकाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे. अभिनेता भूषण प्रधान, प्रियांका केतकर यांनी रसिकाच्या व्हिडीओवर कमेंट्स करुन तिला शुभेच्छा दिल्या.
रसिकाला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तिनं या मालिकेत शनाया ही भूमिका साकारली. पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॉप, गॅटमॅट, गर्लफ्रेंड या चित्रपटांमध्ये रसिकानं काम केलं आहे. रसिका ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो रसिका शेअर करत असते. 18 ऑक्टोबर 2021 रोजी रसीकानं आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली. रसिका आणि आदित्य हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. रसिकाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Rasika Sunil: मस्तीखोर, नटखट शनाया म्हणजेच रसिकाचा बोल्ड अंदाज