Rashmika Mandanna Dating Bellamkonda Sreenivas : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येदेखील रश्मिकाने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. रश्मिकाचा मोठा चाहतावर्ग असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सिनेमांसह रश्मिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. रश्मिका दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाला (Vijay Deverakonda) डेट करत असल्याची चर्चा होती. पण आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे. तसेच तिचं नाव आता अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवाससोबत (Bellamkonda Sreenivas) जोडलं जात आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्ना सध्या बेलमकोंडा श्रीनिवासला डेट करत आहे. दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले असून दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. पण आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे. 






रश्मिकाच्या ‘पुष्पा 2’ची चर्चा!


'पुष्पा: द रूल' या सिनेमात 'पुष्पा: द राईज' प्रमाणेच प्रेक्षकांना ड्रामा, अॅक्शन आणि थ्रील बघायला मिळणार आहे. 'पुष्पा: द रूल' हा सिनेमा जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमातील डायलॉग, कथानक आणि चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या सिनेमाने 300 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यामुळे 'पुष्पा 2' किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा: द रूल' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन, फहाद फाजिल आणि रश्मिका मंदना हे पहिल्या भागातील कलाकार दिसणार आहेत. तसेच, 'पुष्पा 2'मध्ये विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.


वयाच्या 17 व्या वर्षी रश्मिकाने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. रश्मिकाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. इन्स्टाग्रामवर रश्मिकाचे 29 मिलियन फॉलोअर्स आहेत. रश्मिकाचे बोलके डोळे आणि तिच्या स्मित हास्याने तिने अनेकांना घायाळ केले आहे. 


संबंधित बातम्या


पुष्पाची श्रीवल्ली किती शिकली माहित आहे का? अभिनयाबरोबरच अभ्यासातही देते अभिनेत्रींना टक्कर