Bholaa Dasara Box Office Collection : गेल्या काही दिवसांत अनेक दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य सिनेमा पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'भोला' (Bholaa) हा सिनेमा 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा 'दसरा' (Dasara) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
अजय देवगन गेल्या काही दिवसांपासून 'भोला' या सिनेमाचं प्रमोशन करत होता. शाहरुखच्या 'पठाण'नंतर प्रदर्शित झालेला अजयचा 'भोला' हा पहिलाच बिग बजेट सिनेमा आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने चांगलीच कमाई केली. त्यामुळे 'भोला'देखील बॉक्स ऑफिसवर धमाका करणार अशी शक्यता वर्तवली गेली. पण रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी हा सिनेमा कमाईच्या बाबतीत मागे पडला. 'भोला' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 11.20 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने फक्त 7.80 कोटींची कमाई केली. त्यामुळे रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने फक्त 18.60 कोटींची कमाई केली आहे.
अजयचा 'भोला' पडला मागे
दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार नानीचा 'दसरा' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 23.2 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 9.75 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत 'दसरा' या सिनेमाने 32.95 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे नानीच्या 'दसरा'ने अजयच्या 'भोला'ला मागे टाकलं आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी 2022 हे वर्ष खूप खास होतं. या वर्षात अनेक दाक्षिणात्य सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता. दाक्षिणात्य सिनेमांसमोर बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमेदेखील मागे पडले. 'पुष्पा द राइज', 'आरआरआर' आणि 'केजीएफ 2' सारखे अनेक दाक्षिणात्य सिनेमे रिलीज झाले. लवकरच या सिनेमांचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'केजीएफ 3', 'पुष्पा 2', 'बाहुबली 3' हे दाक्षिणात्य सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सिनेरसिकांमध्ये दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ
दाक्षिणात्य सिनेमांमध्ये असलेला अॅक्शनचा तडका, रहस्य, थरार, नाट्य सिनेरसिकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे पैसा वसूल सिनेमा पाहायचा असेल तर ते दाक्षिणात्य सिनेमे पाहायला पसंती दर्शवत आहेत. बॉलिवूड किंवा मराठी सिनेमा पाहण्यापेक्षा दाक्षिणात्य सिनेमा पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत.
संबंधित बातम्या