Rashmika Mandanna: अभिनेत्री  रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. रश्मिकाचा एक डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रश्मिकाचा हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. हा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्वीट शेअर करुन हा व्हायरल व्हिडीओ क्रिएट करणाऱ्यावर कायदेशीर करवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. आता या व्हिडीओवर अभिनेत्री रश्मिकानं मौन सोडलं आहे. रश्मिकानं एक ट्वीट शेअर करुन डीपफेक व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.


रश्मिकाचं ट्वीट


"हे शेअर करताना मला खूप दु:ख होत आहे आणि माझा डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन पसरवला जात आहे त्याबद्दल मला बोलायचे आहे. हे केवळ माझ्यासाठीच नाही, प्रत्येकासाठी हे अत्यंत भीतीदायक आहे कारण तंत्रज्ञानाचा असा दुरुपयोग केला जात आहे. "


"आज,एक महिला आणि एक अभिनेत्री म्हणून, मी माझे कुटुंब, मित्र आणि हितचिंतक यांचे आभार मानते, जे माझे संरक्षण आणि समर्थन करत आहेत. पण जर हेच मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना  माझ्यासोबत असे घडले असते तर मी हे कसे हाताळू शकले असते, याची मी खरोखर कल्पना करू शकत नाही. आपल्यापैकी अधिक लोकांवर या गोष्टीचा परिणाम होण्याआधी एक समुदाय म्हणून तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.", असं रश्मिकानं ट्वीटमध्ये लिहिलं आहे. 






ओरिजनल व्हिडीओमधील महिला कोण?


 रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओच्या ओरिजनल व्हिडीओमधील महिला ही ब्रिटिश-भारतीय महिला झारा पटेल आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, ती महिला लिफ्टमध्ये जाते.






इतर महत्वाच्या बातम्या:


Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल अन् थेट महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा राग अनावर!