Rashmika Mandanna : सोशल मीडियावर अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ (deepfake video) व्हायरल होऊ लागल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी कायदेशीर कारवाईची मागणी (Bachchan demanded legal action after a deepfake video of Rashmika Mandanna) केली आहे. व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे.
'ऑल्ट न्यूज'च्या अभिषेक यांनी रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ (deepfake video) व्हायरल होऊ लागल्यानंतर ट्विट करत हा व्हिडिओ ट्विट करत प्रकरणाचा वाचा फोडली. त्यांनी हा मूळ व्हिडिओ झारा पटेल या ब्रिटीश-भारतीय असलेल्या महिलेचा आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर 415K फॉलोअर्स आहेत. 9 ऑक्टोबर रोजी तिने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. हाच व्हिडिओ डीपफेक करण्यात आला.
बच्चन यांची कायदेशीर कारवाईची मागणी
हुबेहुब पद्धतीने डीपफेक व्हिडिओ करून व्हायरल करण्यात आल्यानंतर अमिताभ बच्च यांनी अशा प्रकारच्या व्हिडिओवरून कायदेशीर कारवाईची मागणी केली. बच्चन यांनी व्हिडिओ रिट्विट करत होय, ही कायदेशीर केस असल्याचे सांगितले.
मूळ व्हिडिओमधील महिला ब्रिटिश-भारतीय महिला झारा पटेल असून तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत. जर एखाद्याने व्हिडिओ पाहिला तर फेक असल्याचे शोधणे अत्यंत कठीण आहे. तथापि, जवळून निरीक्षण केल्यावर लक्षात येते की ती महिला लिफ्टमध्ये प्रवेश करते तेव्हा अचानक तिचा चेहरा अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर बदलतो.
रश्मिका मंदान्नाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्याने अनेकांना धक्का बसला असून त्यांनी अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या