Rashmika Mandana: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. रश्मिकानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील लोकप्रियता मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिकानं गुडबाय या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पुष्पा या चित्रपटामुळे रश्मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर काही नेटकरी रश्मिकाच्या अभिनयाचं कौतुक करतात तर काही तिला ट्रोल करतात. आता नुकतीच रश्मिकानं ट्रोलिंगबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. 


रश्मिकाची पोस्ट


रश्मिकानं तिचा एक फोटो शेअर करुन पोस्टमध्ये लिहिलं, 'गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून किंवा वर्षांपासून काही गोष्टींमुळे मला त्रास होत आहे.  मला वाटते की मी यावर लक्ष देण्याची वेळ आली आहे. मी फक्त माझ्यासाठी बोलत आहे. हे मी काही वर्षांपूर्वी करायला पाहिजे होते. मी करिअरला सुरुवात केल्यापासून मला खूप द्वेषाचा सामना करावा लागला आहे. ट्रोलर्स मला अक्षरशः एका पंचिंग बॅग प्रमाणे वागणूक देत होते.'


'जेव्हा सोशल मीडियावर माझी थट्टा केली जाते आणि विशेषतः मी न केलेल्या गोष्टींसाठी माझी थट्टा केली जाते तेव्हा, हे सर्व हृदय पिळवटून टाकणारे आणि स्पष्टपणे निराश करणारे आहे, अशा भावना माझ्या मनात निर्माण होतात.' असंही पोस्टमध्ये रश्मिकानं लिहिलं.  


पुढे पोस्टमध्ये रश्मिकानं लिहिलं, 'माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येकावर माझं प्रेम आहे, मी आतापर्यंत ज्या लोकांसोबत काम केले आहे, त्यांचे मी नेहमीच कौतुक केले आहे. मी कठोर परिश्रम करत राहीन आणि तुम्हाला आनंदी करत राहील. कारण  तुम्ही आनंदी असाल तरच मी आनंदी राहू शकते.'






वयाच्या 17 व्या वर्षी रश्मिकाने आपल्या करिअरला सुरुवात केली. रश्मिका साऊथ सिनेसृष्टीतून बॉलीवूडची सुपरस्टार बनली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर रश्मिकाचे 35 मिलियन फॉलोअर्स आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


पुष्पाची श्रीवल्ली किती शिकली माहित आहे का? अभिनयाबरोबरच अभ्यासातही देते अभिनेत्रींना टक्कर