नवी दिल्ली : रॅपर-संगीतकार बाबा सहगलने वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) समर्थनासाठी एक खास रॅप लॉन्च केलं आहे.


भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठं पाऊल म्हणून जीएसटीकडे पाहिलं जातं. शनिवारी रात्री 12 वाजता संसदेत आयोजित सोहळ्यात जीएसटीचं लॉन्चिंग झालं. या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह दिग्गज उपस्थित होते.

रॅपर बाबा सहगलने यूट्यूबवर गाणं लॉन्च केलं असून, ट्वीट केलंय की, “जीएसटी लागू झालं आहे. त्यामुळे लोकांनी आता इमानदारी दाखवावी. कंट्री करेगी ग्रो, जीएसटी भर दो ब्रो... खादी पहनो फायदा होगा, स्ट्रेस लाईफ में आधा होगा..”

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘बँक चोर’ सिनेमात बाबा सहगल दिसला होता. ‘बाए, बाबा और बँक चोर’ गाण्याला बाबानेच संगीतबद्ध केलं असून, गीतलेखन आणि गायनही बाबा सहगलचंच आहे.

पाहा व्हिडीओ :