'चेन्नई एक्स्प्रेस'फेम निर्माते करीम मोरानींवर बलात्काराचा गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2017 09:04 AM (IST)
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते करीम मोरानी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2015 मध्ये लग्नाचं आमिष दाखवून मुंबईत दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप दिल्लीच्या 25 वर्षीय तरुणीनं केला आहे. हैदराबादजवळच्या हयातनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. करीम मोरानी हे शाहरुख खानचे अत्यंत जवळचे मित्र असून त्याच्या चेन्नई एक्स्प्रेस, हॅपी न्यू इयर यासारख्या अनेक चित्रपटांचे निर्माते आहेत. करीम आणि त्यांचा भाऊ मोहम्मद हे सिनेयुग फिल्म्स ही प्रोडक्शन कंपनी चालवतात. करीम मोरानी यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने अत्यंत तथ्यहीन आरोप केल्याचा दावा, मोरानींच्या प्रवक्त्याने केले आहेत. करीम यांचा न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास असून कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची त्यांची तयारी आहे, असं प्रवक्त्याने सांगितलं आहे. करीम मोरानी यांना 2011 साली टूजी घोटाळ्यातही अटक झाली होती.