मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने आपला एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आपल्या विनोदी स्वभावामुळे रणवीर नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने स्वित्झर्लंडमधील व्हिडीओ शेअर केला आहे.

 

या व्हिडीओमध्ये रणवीर "राजा हिंदुस्तानी" या सिनेमामधील "परदेसी परदेसी" गाणे म्हणताना दिसत आहे. आपल्या बेसूर आवाजात रणवीर गात असून त्याच्या आसपास असलेल्या पर्यटकांचं हसणंही या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.

 
रणवीर सिंह या महिन्याच्या सुरूवातीला स्वित्झर्लंडमध्ये सुट्टीसाठी गेला होता. आपल्या इंस्टाग्रामवरुन रणवीर त्याच्या आगामी सिनेमा 'बेफिक्रे'चं प्रमोशन करत आहे. हा व्हिडीओही त्याच्या प्रमोशनचाच एक भाग मानला जात आहे. या व्हिडीओला नेटसॅव्हींची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते आहे.

 
पाहा व्हिडीओ :