रणवीर-दीपिकाची 'गुंतवणूक', गोव्यात बंगला खरेदी?
एबीपी माझा वेब टीम | 11 Jan 2018 11:37 AM (IST)
सुनिल गावसकर आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा बंगला असलेल्या परिसरातच दीपिका-रणवीरने घर खरेदी केल्याची माहिती आहे.
मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण चोरीछुपे साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांना वर्षाच्या सुरुवातीला उधाण आलं होतं. अद्याप दोघांनीही आपल्या रिलेशनशीपला अधिकृत दुजोरा दिला नसला, तरी त्याबाबतचे संकेत वारंवार मिळतात. त्यातच, रणवीर-दीपिकाने आता बंगल्यात एक पॉश बंगला विकत घेतल्याची माहिती आहे. रणवीर आणि दीपिका यांची मनं एकमेकात किती गुंतली आहेत, हे पाहायला मिळतंच, पण आता दोघांनी स्थावर मालमत्तेत एकत्र गुंतवणूक केल्याचं म्हटलं जात आहे. गोव्यात दोघांनी एक शानदार बंगला विकत घेतल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत. माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा बंगला असलेल्या परिसरातच दीपिका-रणवीरने घर खरेदी केल्याची माहिती आहे. रणवीर सिंगच्या टीमने मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. रणवीरने यापूर्वीच गोव्यात एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा मानस बोलून दाखवला होता. तिथूनच काम करण्याचा त्याचा इरादा होता, मात्र मुंबईत घर घेतल्यास बरं पडेल, अशा विचाराने त्याने हा मनसुबा बदलला होता.