Rangbaaz 3 : अभिनेता विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) हा असाच एक अभिनेता आहे, ज्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. 'मुक्काबाज' चित्रपटात बॉक्सरची भूमिका साकारून त्याने लोकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण केले आणि नंतर आपल्या वेगवेगळ्या अवतारांनी लोकांना चकित करत राहिला. मग, तो ‘बेताल’मधील त्याचा लष्करी अधिकाऱ्याचा अवतार असो किंवा ‘गुंजन सक्सेना’मधील वायुसेनेचा पायलट असो. त्याने आपल्या कामगिरीने स्वतःला सिद्ध केले आहे.
झी5च्या 'रंगबाज - डर की पॉलिटिक्स' (Rangbaaz 3) या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांना या सीझनमध्ये नाटक, राजकारण, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, पॉवर-गेम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विनीत कुमार सिंह याची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये तो पुन्हा एकदा दमदार परफॉर्मन्स देताना दिसणार आहे. या सीरिजमधील विनीत कुमार सिंह याने हारून शाह बेगची (साहेब) भूमिका साकारली आहे. हारून शाह बेग हा बिहारमधील एका छोट्या शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील असून, तो एक अतिशय शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्ती बनतो.
माझ्यासाठी हा निर्णय सोपा होता : विनीत कुमार सिंह
सीरिजमधील या नवीन अवताराबद्दल बोलताना विनित कुमार सिंह म्हणला की, ‘गँगस्टर राजकारणाचे अंधकारमय जग खरोखरच वेगेळे आहे, त्यामुळे हे पात्र खूप गुंतागुंतीचे आहे. कारण एकीकडे तो त्याच्या साहसांद्वारे शक्ती आणि संपत्ती मिळवतो आणि नंतर त्याला यश मिळाल्यानंतर लोकांचा पाठिंबाही मिळतो. तो अनेक लोकांना मदतही करतो. आता त्याचा तिरस्कार करायचा की, त्याच्यावर प्रेम करायचं हे तुम्हा प्रेक्षकांनाच ठरवायचे आहे. पण, हे अनेक रंगांनी भरलेले एक भावपूर्ण पात्र आहे,जे साकारताना मला खूप मजा आली. रंगबाजला आजवर प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आहे आणि या फ्रँचाईझीचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. त्यामुळे ही मालिका स्वीकारण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप सोपा होता आणि ट्रेलर आल्यापासून प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.’
हेही वाचा :
Phone Bhoot Release Date: ‘फोन भूत’ चित्रपटाची रिलीज डेट बदलली! प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार!