Ranbir kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. तसेच रणबीर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. नुकताच रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण रणबीरचं कौतुक करत आहेत.
रणबीरचा व्हिडीओ व्हायरल (Ranbir kapoor Video Viral On Social Media)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर हा पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे. यावेळी एक सिक्युरिटी गार्ड पापाराझीच्या कॅमेऱ्यासमोर येतो. सर्व पापाराझी त्या सिक्युरिटी ओरडू लागतात. काही फोटोग्राफर्स हे सिक्युरिटी गार्डला कॅमेऱ्याच्या समोरून जाण्यास सांगतात.
...म्हणून रणबीरचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रणबीर हा सिक्युरिटी गार्डला त्याच्या जवळ बोलतो आणि त्याच्यासोबत फोटोसाठी पोज देतो. यादरम्यान सिक्युरिटी गार्डच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य दिसते. रणबीरच्या या कृतीचं नेटकरी कौतुक करत आहेत. तसेच या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रणबीरच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "रणबीर खूप नम्र आहे!" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "सेलिब्रिटींचा स्वभाव असाच प्रेमळ असावा"
पाहा व्हिडीओ:
रणबीरचा आगामी चित्रपट
रणबीर हा नितेश तिवारीच्या 'रामायण' या चित्रपटामध्ये काम करणार आहे. हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज होईल, असं म्हटलं जात आहे. या पौराणिक चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. तसेच सनी देओल 'हनुमान'ची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. रणबीरच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
गेल्या वर्षी रणबीरचा अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदानानं प्रमुख भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Animal Ott Release: रणबीर कपूरचा 'ॲनिमल' ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर नेटकरी नाराज; नेमकं कारण काय?