Alia Bhatt Ranbir Kappor Daughter Raha : बॉलिवूडचं 'पॉवर कपल' अर्थात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या रणबीर 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या सिनेमाचं प्रमोश करत आहे. दरम्यान अभिनेत्याने त्याची लेक राहा नक्की कोणासारखी दिसते याबद्दल भाष्य केलं आहे. 


राहा नक्की कोणासारखी दिसते? 


'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाच्या शूटिंगसाठी रणबीरने 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma) या कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान कपिल शर्माने रणबीरला प्रश्न विचारला की, "तुमच्या घरी शेजारच्या बायका येतात का? राहा आलियासारखी दिसते की रणबीरसारखी याबद्दल त्या बोलतात का?" कपिल शर्माला उत्तर देत रणबीर म्हणाला की, "राहा नक्की कोणासारखी दिसते याबद्दल आमच्याही मनात गोंधळ सुरु आहे. कारण ती कधी आलियासारखी दिसते तर कधी माझ्यासारखी. पण आमच्या दोघांसारखी ती दिसते ही आनंदाची बाब आहे." 


रणबीरला सतावत होती 'ही' भीती


रणबीर कपूरचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राहाचा जन्म झाला तेव्हा रणबीर या सिनेमाचं शूटिंग करत होता. या सिनेमातील लुकसाठी रणबीरने दाढी वाढवली होती. त्यामुळे दाढीवाल्या लुकमध्ये राहा त्याला ओळखेल की नाही याची भीती रणबीरला सतत वाटत होती. तसेच दाढी तिला टोचू नये याचीदेखील भीती त्याला वाटत असे. पण राहा त्याच्या डोळ्यात पाहून हसायची. 






तीन महिन्यांच्या राहाचं सर्वत्र कौतुक


आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एप्रिल 2022 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. त्यानंतर लगेचच नोव्हेंबर 2022 मध्ये आलियाने मुलीला जन्म दिला. आलिया-रणबीरची राहा आता तीन महिन्यांची झाली असून तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. परवानगीशिवाय राहाचे फोटो न काढण्याचा सल्ला आलिया-रणबीरने पापाराझींना दिला आहे.  


आलिया-रणबीरचे आगामी सिनेमे


आलिया भट्टचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात आलियासह रणवीर सिंह आणि धर्मेंद्र मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमादेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आलियाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर दुसरीकडे रणबीरचा 'तू झूठी मैं मक्कार' येत्या 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच त्याचा अॅनिमल हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 


संबंधित बातम्या


Brahmastra 2 : 'ब्रह्मास्त्र 2' ची रिलीज डेट ठरली? दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिली मोठी माहिती, म्हणाला...