बॉलिवूडचा सुपरस्टार हिरो रणबीर कपूरला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याचा निरागसपणा त्याच्या चेहऱ्यातून स्पष्ट दिसतो. मात्र, रणबीर जितका निरागस दिसतो तसा तो प्रत्यक्षात नाहीय. लहानपणापासूनच तो खूप खोडकर आहे. रणबीरच्या बालपणाचा एक किस्सा सांगताना आई नीतू कपूर यांनी सांगितले की एकदा त्याने थेट न्यूयॉर्कमधील फायर ब्रिगेडला फोन केला होता. नुकतीच नीतू कपूर सुपर डान्सर 4 शोच्या सेटवर आली होती. तेथे त्यांनी परीक्षक आणि स्पर्धकांसोबत ठेका धरला. सोबतच रणबीर कपूरच्या लहानपणीच्या खोडी सांगितल्या.


गजर दाबून शांत झाला..
शो दरम्यान नीतू कपूर यांनी सांगितले की रणबीर बालपणी खूप खोडकर होता. एकदा रणबीरने अग्निशमन दलाला फोन करुन बोलावले. नीतू म्हणाली, त्यावेळी आमचे कुटुंब न्यूयॉर्कमध्ये होते. आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये होतो तिथे वर रणबीरला फायर अलार्म लावलेला दिसला. याला दाबले तर काय होईल? म्हणून त्याने अलार्म दाबला आणि नंतर गप झाला. अचानक अग्निशमन दलाची अनेक वाहने इमारतीखाली आली. रणबीरला घाबरला. मात्र, हे काम मी केलय असं त्याने कोणालाच सांगितले नाही. तो त्याच्या आजीकडे गेला आणि हळूच तिला सांगितलं.


रणबीरने पहिल्या पगारातून माझ्यासाठी लंच आणला
रणबीरची आणखी एक आठवताना सांगताना नीतू म्हणाली की जेव्हा रणबीरला पहिला पगार मिळाला तेव्हा त्याने माझ्यासाठी जेवण विकत आणले आणि गाण्यावर डान्स केला. नीतूने शो दरम्यान सांगितले की शोमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा दादा (अनुराग बसु) बरोबर डान्स करतो. मी दादाला पाहुण्यांसोबत नाचताना पाहिले आहे. माझ्या मुलाचे गाणं त्यांच्यासोबत करण्याची माझी फार इच्छा आहे. यानंतर नीतू कपूर यांनी रणबीरच्या जग्गा जासूस या चित्रपटातील गाने गलती से मिस्टेक गाण्यावर अनुराग बासू यांच्याबरोबर गायन केले.


नीतू बर्‍याचदा रिअॅलिटी शोच्या सेटवर जात असते. यापूर्वी ती अनेकदा पती ऋषी कपूरसमवेत रिअॅलिटी शोमध्ये जात असे. पण ऋषी कपूरच्या निधनानंतर आता ती एकटीच राहिली आहे आणि बर्‍याच प्रसंगी त्याच्या आठवणीत भावनिक होते.