रणबीरच्या अरेंज मॅरेजसाठी आई नीतू कपूरचं वधूसंशोधन
एबीपी माझा वेब टीम | 30 Nov 2017 11:46 PM (IST)
सर्व अभिनेत्रींना बाद करत कपूर खानदानात वेगळ्याच सूनबाई येण्याची चिन्हं आहेत. कारण नीतू सिंग यांनी लेकाच्या लग्नाचं मनावर घेतलं आहे.
मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर बॉलिवूडमधल्या एखाद्या अभिनेत्रीसोबत लव्ह मॅरेज करेल, असा अंदाज चाहत्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रेटींनी बांधला होता. मात्र हा अंदाज खुद्द रणबीरची आईच खोटं ठरवण्याची शक्यता आहे. कारण टिपीकल आईवर्गाप्रमाणे नीतू सिंग-कपूर यांनीही लेकासाठी वधूसंशोधन सुरु केलं आहे. त्यामुळे रणबीरचं अरेंज मॅरेज होण्याची शक्यता आहे. रणबीर कपूर हा बॉलिवूडमधला मोस्ट एलिजिबल बॅचलर मानला जातो. त्याचं नाव आधी दीपिकासोबत जोडलं गेलं. त्यानंतर कतरिना कैफ त्याच्या आयुष्यात आली. नुकत्याच माहिरा खानसोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मात्र या सर्व अभिनेत्रींना बाद करत कपूर खानदानात वेगळ्याच सूनबाई येण्याची चिन्हं आहेत. कारण नीतू सिंग यांनी लेकाच्या लग्नाचं मनावर घेतलं आहे.