मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफसोबत झालेल्या कथित ब्रेकअपनंतर रॉकस्टार अभिनेता रणबीर कपूर अनेकदा चिडचिडा झाल्याचं पाहिलं जात आहे. काहीच दिवसांपूर्वी रणबीर एका फोटो जर्नलिस्टवर भडकला आणि त्याचा फोन हिसकावून घेतल्याचं वृत्त आहे.
रणबीर त्याचा मित्र, प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या घरी चालला होता. त्यावेळी एका पत्रकाराने त्याचा पाठलाग केल्याचं पाहून रणबीरचा पारा चढल्याचं 'स्पॉटबॉय.कॉम'च्या वेबसाईटने दिली आहे. रणबीरने तंबी देऊनही न जुमानणाऱ्या पत्रकाराचा फोनच त्याने
हिसकावला.
फोन घेऊन रणबीर निघाला आणि नंतर माझ्याकडून कलेक्ट कर असं संबंधित पत्रकाराला सांगितलं. अयानसोबत डिनर घेतल्यानंतर पहाटे तीन वाजता रणबीर तिथून निघाला. रडवेल्या चेहऱ्याने तो पत्रकार तिथेच रणबीरची आणि पर्यायाने आपल्या फोनची वाट पाहत होता. ते पाहून पुन्हा रणबीरने त्याला कडक शब्दात समज दिली आणि निघून गेला.
'माझा ठावठिकाणा लपवण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न करुनही जवळजवळ रोजच हे पत्रकार आमचा पिछा पुरवतात. माझं वैयक्तिक आयुष्य आहे आणि माझा पाठलाग करु नका असं वारंवार सांगूनही ते ऐकत नाहीत. अगदी आमच्या फॅमिली डॉक्टरच्या क्लिनिकबाहेरही पत्रकार दबा धरुन बसतात.' अशी विनवणी रणबीरने केली.