Ranbir kapoor And Alia Bhatt Latest Video: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या लग्नाबाबत गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. आलिया आणि रणबीर येत्या डिसेंबर महिन्यात विवाह बंधनात अडकण्याची शक्यता आहे, तशा चर्चादेखील होत आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नासाठी आतुर झाले आहेत. अशातच आलिया आणि रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नीतू कपूर घराच्या बांधकाम साइटवर दिसून येत आहेत.
रणबीर कपूर आणि नीतू कपूर नवीन घराचे बांधकाम पाहण्यासाठी गेल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते अनेकदा साइटवर स्पॉट झाले आहेत. व्हिडिओमध्ये नीतू कपूर काहीतरी खुलासा करताना दिसत आहे. त्यानंतर रणबीर कपूर आणि नीतू कपूर एकत्र जातात, तर आलिया भट्ट स्वतंत्रपणे जाताना दिसून येते.
Pushpa Film: Allu Arjun आणि Rashmika Manadana चा 'पुष्पा- द राइज' सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित होणार नाही, जाणून घ्या कारण..
यंदाची दिवाळी आलिया आणि रणबीरने एकत्र मिळून साजरी केली आहे. नात्याची अधिकृतरित्या माहिती देत आलियाने रणबीरसोबतचा फोटोदेखील शेअर केला होता. त्या फोटोवर आलियाने कॅप्शन लिहली होती,"निव्वळ प्रेम..दिवाळीच्या शुभेच्छा".
Sooryavanshi Box Office: Akshay Kumar च्या 'सूर्यवंशी' सिनेमाने सलग दुसऱ्या दिवशी केला बॉक्स ऑफिसवर धमाका
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगलेल्या होत्या. त्यानंतर आलियाच्या आईने एका कार्यक्रमात यावर स्पष्टीकरण दिले होते. लग्नासंदर्भात 'सोनी राजदान' म्हणाल्या, "आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नासाठी मी देखील उत्सुक आहे. पण त्याला बराच वेळ आहे. भविष्यात दोघांचे लग्न होणारच आहे. पण अजून लग्नाची तारिख ठरलेली नाही".