Continues below advertisement

मुंबई : बॉलिवूडचा ही-मॅन, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन (Dharmendra Passes Away) झालंय. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील विलेपार्लेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सनी देओलनं धर्मेंद्र यांना मुखाग्नी दिला. अंत्यसंस्कारासाठी सिनेसृष्टीसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेही (Ramdas Athawale) उपस्थित होते. अंत्यसंस्काराच्यावेळी आपण आतमध्ये उपस्थित होतो असं आठवलेंनी सांगितलं.

धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह अनेक सिने अभिनेत्यांनी अंत्यसंस्काराला लावली होती उपस्थिती. धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना आपण हेमा मालिनी, सनी देओलसोबत आतमध्ये उपस्थित होतो असं रामदास आठवले म्हणाले.

Continues below advertisement

Ramdas Athawale On Dharmendra : धर्मेद्र यांच्यासोबत अनेकदा भेटी

रामदास आठवले म्हणाले की, "आज सकाळीच मला माहिती मिळाली की धर्मेंद्र यांचे निधन झालं. मी मोदी सरकार मधला मंत्री म्हणून लगेचच येथे आलो. धर्मेंद्र हे खासदार असताना 2004 ते 2009 च्या दरम्यान अनेकदा संसदेत भेटायचे. आमची चांगली ओळख होती. हेमामालिनी यांच्यासोबतसुद्धा मी खासदार असल्यामुळे त्यांच्यासोबत सुद्धा अनेकदा भेटी होतात. त्यामुळे सिनेसृष्टीतील या अभिनेत्याच्या बाबतीत माझ्या अनेक आठवणी आहेत."

गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्यावर सुरुवातीला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. 12 नोव्हेंबर रोजी देओल कुटुंबीयांच्या विनंतीवरून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या जुहूतील राहत्या घरीच उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचीही माहिती मिळत होती. अखेर आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली आणि देशभरातील त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, "धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व होते, एक असाधारण अभिनेता होते ज्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. त्यांनी विविध भूमिका ज्या पद्धतीने साकारल्या त्या असंख्य लोकांच्या मनाला भिडल्या. धर्मेंद्रजी त्यांचा साधेपणा, नम्रता आणि प्रेमळपणासाठी तितकेच प्रशंसनीय होते. या दुःखाच्या वेळी, माझे विचार त्यांच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत."

ही बातमी वाचा: